फ्रान्स : बाजारातून १००० टन साखर परत मागवली

पॅरिस: बेघीन ब्रँडने उत्पादित केलेल्या साखरेपैकी काही टन साखर फ्रान्सने परत मागवली आहे. या साखरेच अधिकृत प्रमाणापेक्षा अधिक पेस्टिसाइड्स असल्याचा आक्षेप आहे.

प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, साखरेची काही पोती फ्रान्समध्ये परत मागविण्यात आली आहे. यामध्ये अधिकृत प्रमाणापेक्षा अधिक पेस्टिसाईड्सचे प्रमाण आहे. साखर उत्पादक टेरियोसने २२ जून रोजी स्पष्ट केले की, १००० टन साखर परत मागविण्यात आली आहे. तर आणखी १००० टन साखरेची डिलिव्हरी थांबविण्यात आली आहे.

बेघिन ब्रँडच्या बेघीन सईच्यावतीने सांगण्यात आले की, साखर परत मागविण्याची प्रक्रिया युरोपीयन कायद्याद्वारे अधिकृत प्रमाणापेक्षा अधिक इथिलीन ऑक्साईड असल्याने सुरू करण्यात आली आहे. इथिलीन ऑक्साईडला कार्सिनोजेनच्या रुपात ओळखले जाते. ज्या नागरिकांनी अशा किटकनाशकाचे अधिक प्रमाण असलेली साखर खरेदी केली असेल, तर त्यांनी साखर वापरलेले पदार्थ खाऊ नयेत आणि साखर फेकून द्यावी असे आवाहन कंपनीच्यावतीने करण्यात आली आहे.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here