पॅरिस : फ्रान्सचा सर्वात मोठा साखर आणि इथेनॉल उत्पादक समूह Tereos ने बुधवारी आपल्या समुहाच्या पुनर्गठणाची घोषणा केली. यामध्ये उत्तर फ्रान्समधील एका कारखान्यातील साखर उत्पादन बंद करण्याचाही समावेश आहे. कारण, हा कारखाना साखर उत्पादनात खूप मोठ्या घसरणीचा सामना करीत होता. साखरेच्या किमतीमधील वाढीने गेल्या महिन्यात तिसऱ्या तिमाहीत चांगल्या परिणामांसाठी टेरोसला मदत मिळाली आहे. मात्र, हा समुह अद्यापही आपल्या कर्जात कपात करण्यासाठी संघर्ष करीत आहे. साखरेच्या चढ्या किमतीनंतरही कंपनीने सांगितले की, त्यांना आगामी २०२३-२४ या हंगामासाठी १० टक्के कमी बीट उपलब्ध होतील. ब्राझीलमध्ये आपल्या घडामोडींमळे टेरोस हा जगातील द्वितीय क्रमांकाचा साखर उत्पादक समूह आहे.
टेरोसने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, बीट उत्पादनाच्या क्षमतेमध्ये निश्चितच सुधारणा होत आहे. मात्र, सहकारी सदस्यांना आरोग्य, पर्यावरण अशा विनियामक आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी लागवड क्षेत्रात सातत्याने घट येत आहे. बीट उत्पादक समूह सीजीबीच्या प्रमुखांनी गेल्या महिन्यात रॉयटर्सला सांगितले की, या वर्षी फ्रान्समध्ये बीटच्या पिक क्षेत्र १४ वर्षापूर्वीच्या निच्चांकी स्तरापर्यंत घसरू शकते. नियोनिकोटिनोइड कीटकनाशकांवर निर्बंध लागू झाल्याने शेतकरी पिकाच्या संभाव्य हानीमुळे चिंतेत आहेत.