फ्रान्स : साखरेसाठीच्या बिटाचे उत्पादन घटणार?

फ्रान्स : चीनी मंडी

साखर तयार केली जाणाऱ्या बिटाचे उत्पादन यंदा फ्रान्समध्ये घटण्याची शक्यता आहे. फ्रान्समधील साखरेच्या सहकारी टेरिओस समुहाच्या म्हणण्यानुसार पिकाच्या सॅम्पलमधून यंदा उत्पादन घटण्याची शक्यता दिसत आहे. यंदा प्रति हेक्टर ६१.८ टनच उत्पादन होण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षांतील सरासरी उत्पादनापेक्षा हे उत्पादन कमी असणार आहे. रॉयटर्स या न्यूज एजन्सीने ही माहिती दिली.

या पिकांच्या सॅम्पलनुसार २०१८च्या पिकामध्ये साखरेचा अंश गेल्या पाच वर्षांपेक्षा अधिक होता. यासंदर्भात टेरिओसने अधिक माहिती दिलेली नाही. या संदर्भात टेरिओसने २०१७ची आकडेवारी तसेच सरासरी आकडेवारी दिलेली नाही. या वर्षीच्या कोरड्या हवामानामुळे बिटाची वाढ पूर्ण व्हावी, यासाठी टेरिओसने एक आठवडा उशिरा सॅम्पल घेऊन कॅम्पेनिंग सुरू केले आहे. या साठी १५० ठिकाणच्या शेतांमधून सॅम्पल घेण्यात आली होती. त्यानंतर यापुढे १० सप्टेंबरपर्यंत आणखी सॅम्पल घेण्याचे काम सुरू राहणार आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here