साखर कारखाने देत आहेत मोफत ऑनलाईन शिक्षण

हरियावा: कोरोना संकटा दरम्यान शिक्षण कार्य एक आव्हान बनले आहे. अशामध्ये जिल्ह्यातील तीन साखर कारखानाने प्रथम एज्युकेशन फाउंडेंशन च्या मदतीने 62 गावांमध्ये ऑनलाइन शिक्षणाचा उपक्रम मोफत चालवत आहेत. या कार्यक्रमांतर्गत थोडी मस्ती थोडा अभ्यास या माध्यमातून मुलांना माहिती दिली जात आहे.

जिल्ह्यामध्ये तीन कारखाने हरियाव, लोनी आणि रुपापूर मध्ये आहेत. तीनही साखर कारखान्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करणार्‍या प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या मदतीने विद्यार्थ्यांना कोरोना काळात चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. या अतर्गत अशा प्रकारे मुलांकडून अभ्यास करुन घेतला जातो की, विध्यार्थ्यांना ते ओझे वाटत नाही. या कार्यक्रमाचे नाव खूशहाली असे दिले आहे, पण या दिवसात सुरु असलेल्या अभियानाला थोडी मस्ती, थोडा अभ्यास असे नाव दिले आहे. तीनही साखर कारखान्यांमध्ये जवळपास सर्व ग्राम पंचायतींमध्ये आपल्या दहा दहा स्वयंसेवकांना पूर्वीपासूनच जोडून ठेवलेले आहे. सरासरी यापैकी प्रत्येक गावात सहा स्वयंसेवी सक्रियही राहत आहेत. यांच्या माध्यमातूनच पूर्ण योजनेला साकारण्यात आले आहे.

हरियावा साखर कारखान्याचे यूनिट हेड प्रतीप त्यागी यांनी सांगितले की, साखर कारखान्यांकडून 40 टॅबलेट ग्राम पंचायतींमद्ये शाळांना दिले आहेत. 22 ठिकाणी मोबईल फोनवरुन शिक्षण घेतले जात आहे. सामान्य ज्ञान, गणित, कंम्प्यूटर आणि बेसिक नॉलेज चे ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे.

विद्यार्थ्यांचा अभ्यास शाळेत होत नाही. सोशल डिस्टंन्स ला लक्षात घेवून साखर कारखान्यांशी जोडलेले स्वयंसेवक आपल्या घरातूनच परिक्षा आणि शिक्षण देत आहेत.जेव्हा कधी परिक्षांचे आयोजन होईल तेव्हा सोंशल डिस्टंन्सिग चे पालन केले जाईल.

साखर कारखाने देत आहेत मोफत ऑनलाईन शिक्षण हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here