ओंकार कारखान्याकडून मोफत साखर वाटप

सोलापूर : ओंकार साखर कारखाना चांदापुरी युनिट १ च्यावतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व कामगारांना दिवाळीसाठी उसाच्या प्रमाणात मोफत साखरेचे वाटप केन मॅनेजर शरद देवकर व रामभाऊ मगर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मगर म्हणाले, ओंकार परिवाराचे चेरअमन बाबुराव बोत्रे-पाटील, संचालिका रेखाताई बोत्रे-पाटील, संचालक प्रशांत बोत्रे-पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी मोफत साखर दिली आहे. ओंकार परिवारान वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, अन्नदान, अन्नधान्य कीटचे वाटप असे सामाजिक उपक्रमही राबविले आहेत. कारखान्याच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांत देणे शक्य ते देण्याचा प्रयत्न बोत्रे-पाटील यांनी केला आहे. यावेळी जनरल मॅनेजर भीमराव वाघमोडे, शेतकी आधिकारी विष्णू गोरे, शेती विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी व कामगार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here