मुरैना : मध्य प्रदेशातील मुरैना येथे मालगाडीच्या डब्यातून साखरेची पोती लुटल्याचा प्रकार उघड झाला आहे. चोरट्यांनी सिकरौदा रेल्वे स्टेशनवर थांबलेल्या गाडीचा डबा तोडून त्यातून साखरेची पोती पळवली. यावेळी घटनास्थळी आलेल्या आरपीफएने चोरट्यांवर गोळीबार केला. चोरट्यांनीही गोळीबार करत बचाव केला. गोळीबाराच्या प्रकार सुरू असताना चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. एका चोरट्याच्या पायात गोळी लागली आहे. पोलिसांनी त्याला जिल्हा इस्पितळात दाखल केले आहे.
दैनिक भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गोवा एक्स्प्रेसचे इंजिन फेल झाल्याने सिकदौरा रेल्वे स्टेशनवर मालगाडी थांबविण्यात आली होती. याचे इंजिन गोवा एक्स्प्रेसला लावण्यात आले. रात्री चोरट्यांनी या थांबलेल्या मालगाडीचा डबा तोडून साखरेची पोती चोरण्यास सुरुवात केली. घटनास्थळी पोहोचलेल्या आरपीएफने चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोन्हीकडून गोळीबार करण्यात आला. यावेळी शेतात पोती सोडून चोरांनी पळ काढला. गोळीबारीचा प्रकार उघड होताच ग्वाल्हेरहूनही आरपीएफचे जवान दाखल झाले असून ६३ पोती साखर जप्त करण्यात आली आहे.