तीन वर्षापासून गोडाऊन मध्ये खराब होत आहे ४५० क्विंटल साखर

 

बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे ,आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच

देवघर (झारखंड) : चीनी मंडी

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात गेल्या तीन वर्षांपासून ४५० क्विंटल साखर पडून राहिली आहे. बाजारात या साखरेची किंमत जवळपास १७ लाख रुपये होत आहे. गोदामात साखरेची अवस्था वाईट आहे. अनेक ठिकाणी साखरेला बुरशी लागली आहे. तर जमिनीवर पडलेल्या साखरेच्या गाठी झाल्या आहेत. बाजार समितीचीच्या गोदाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे साखरेचे नुकसान झाले असून, ती गरिबांच्या पदरातही पडलेली नाही.

या संदर्भात गोदाम विभागाचे व्यवस्थापक मोहन झा यांनी सांगितले की, गोदामातील साखर गरिबांना वितरीत करण्यासाठी आणण्यात आली होती. पण, सरकारकडून ही साखर रेशन कार्डधारकांना वितरीत न करण्याचे आदेश मिळाले आहेत. त्यामुळे ही साखर पडून आहे. या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात माहिती देण्यात आली आहे. गोदामाचा बराचसा भाग खरा झाला आहे. साखरेची ही समस्या असल्यामुळे आता वितरणासाठी आलेला तांदूळ ठेवण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत.

अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा

साखरेचे वितरण रोखल्यानंतर ती परत पाठवण्याविषयी कोणी गांभीर्याने विचार केला नाही. अधिकाऱ्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. याचा विचार केला असता, तर एवढी साखर वाया गेली नसती. केवळ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांच्या, कारखान्यांच्या मेहनतीने तयार झालेली साखर गरिबांच्या मुखात न पडता वाया गेली आहे.

सरकारकडून गंभीर दखल

या प्रकरणाची राज्याच्या पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली आहे. यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश विभागीय सचिवांना देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री शरयू राय यांनी दिली.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲपhttp://bit.ly/ChiniMandiApp  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here