जाणून घ्या महाराष्ट्रातील सध्याची एफआरपी थकबाकी

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

पुणे : चीनी मंडी

ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी, अद्याप ऊस बिलांची थकबाकी मोठ्या प्रमाणावर आहे. राज्यात अजूनही ४ हजार ८६४ कोटी रुपयांची ऊस बिल थकबाकी आहे. सरकारच्या अनेक प्रयत्नांनंतरही ऊस बिल थकबाकी कमी होण्याची चिन्हे नसल्याचे दिसत आहे.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला मागणी नाही. त्यामुळे साखर कारखाने तोट्यात आले आहेत. साखरेचा उत्पादन खर्च ३४०० ते ३५०० रुपये प्रति क्विंटल असताना विक्री दर मात्र २९०० रुपये होता. साखर कारखान्यांना क्विंटलमागे दोनशे ते तीनशे रुपयांची तूट सहन करावी लागत होती. साखरेची विक्री करून मिळणारे पैसे आणि एफआरपीचा दर याचा ताळमेळच बसत नसल्याने साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करण्याची मागणी साखर उद्योगातून झाली. त्याला सरकारने प्रतिसाद देत ३१०० रुपये प्रति क्विंटल दर केला. मात्र, त्याचा फारसा परिणाम साखर उद्योगात दिसत नाही.

साखर आयुक्तालयाने थकबाकीदार कारखान्यांवर कारवाई सुरु केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यांवर एफआरपी जमा होऊ लागली. यंदाच्या हंगामात राज्यातील साखर कारखान्यांनी १२ हजार ९४९ कोटी २८ लाख रुपये शेतकऱ्यांना अदा केले आहेत. यातील जवळपास ७ हजार ७५० कोटी रुपये रक्कम जानेवारी आणि फेब्रुवारी दोन महिन्यात देण्यात आले आहेत. त्यामुळे सध्याची ऊस बिल थकबाकी ४ हजार ८६४ कोटी रुपयांच्या आसपास आहे.

महाराष्ट्रात यंदाच्या हंगामात १९३  साखर कारखान्यांनी यंदा गाळप सुरू केले आहे. राज्यात १५ फेब्रुवारी पर्यंत ७६२.०९ लाख टन ऊस गाळप झाला. त्यानुसार आतापर्यंत १७ हजार ८१४ कोटी २५ लाख रुपयांची एफआरपीची रक्कम देय होती. आतापर्यंत राज्यातील सुमारे ६५ कारखान्यांनी त्यांच्या सभासद शेतकऱ्यांना ८० टक्क्यांहून अधिक रक्कम दिली आहे.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here