“कारखानदारांनी मालमत्ता विक्री करून एफ.आर.पी. ची रक्कम तातडीने द्या” – महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर, 27 मे 2018 : यावर्षीचा गळीत हंगाम सुरू होत असताना साखर कारखान्यांनी जाहीर केलेली एफआरपी पूर्णक्षमतेने मिळालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे, एफआरपीची रक्कम तत्काळ द्यावी, कोणतेही कारण न सांगता कारखानदारांनी कारखाने, स्वत:चे घर-दार, मालमत्ता विक्री करून एफआरपीची रक्कम तत्काळ द्यावी, असा इशारा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. केंद्रात भारतीय जनता पार्टीच्या सरकारला चार वर्ष पूर्ण झाले, यानिमित्त त्यांनी कोल्हापूरमध्ये एफआरपीची रक्कम देण्याबाबत राज्यातील साखर कारखान्यांना सूचना दिली. तर, आज (दि. 28) साखर आणि ऊस दर प्रश्‍नाबाबत बैठक घेतली जाणार असल्याचेही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
पालकमंत्री पाटील म्हणाले, यावर्षी साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेत साखर विक्री ठप्प झाली आहे. परिणामी साखरेचे दरही कोसळले आहेत. या सर्वाचा परिणाम एफआरपीवर झाला आहे, ही वस्तुस्थिती आहे. असे असले तरी कारखानदारांना साखर कारखाने, घरं-दारं, मालमत्ता विकून एफआरपी द्यावीच लागेल. कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांची तर परिस्थिती बिकट आहे. कारखाने याकडे गांर्भिर्याने पाहत नाहीत. साखर कारखानदारांना थकीत एफआरपीची रक्कम वेळेत द्यावीच लागेल.
साखर उद्योगात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर केंद्र सरकार आणि राज्य शासन योग्य तो तोडगा काढेल. शेतकऱ्यांना उसाचे पैसे तत्काळ मिळावेत यासाठी शासनने एफआरपीचा कायदा केला, शेतकऱ्यांना उसाचे चार पैसे जास्त मिळावेत यासाठी एफआरपीमध्ये दोन वेळा वाढ केली आहे. एकीकडे सरकार शेतकऱ्यांना एफआरपी वाढवून देत असताना कारखाने मात्र त्याकडे दुर्लक्ष करतात असे होवू देणार नाही. कारखान्यांनी एफआरपी दिलीच पाहिजे. आत साखरेला दर नाहीत, अशी कारणे सांगून चालणार नाहीत, तर उसाची एफआरपी देण्यासाठी कारखाने विका नाहीतर मालमत्ता विका पण एफआरपी द्यावेच लागेल.
……………

आज मुंबईत बैठक
साखर व ऊस दराबाबत मुंबईत सोमवारी (दि. 28) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे बैठक घेणार आहेत. यातून साखरेचा दर आणि उसाची एफआरपी यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

SOURCEChiniMandi

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here