एफआरपीचे थकित 1159 कोटी पैकी 365 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर

918

कोल्हापूर, दि. 13 जुलै 2018 : गेले दोन ते तीन महिन्यांमध्ये साखर दरांमध्ये झालेली वाढ आणि सरकारने स्थिर ठेवलेले साखरेचे दर यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षेत असलेली एफ आर पी देण्यास मदत झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची 1159 कोटी थकित एफआरपी पैकी 385 कोटी रुपये एफ आर पी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ती वर्ग करण्यात आली आहे. उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत म्हणजे एफआरपीची कोट्यावधी रुपयांची रक्कम थकीत राहिली आहे. दरम्यान 14 दिवसाच्या अद्याप एफआरपी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी आणि संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले होते. यामुळे सरकारनेही साखरेचा किमान विक्री दरात वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांना एफबी देणे शक्य झाले आहे.
30 जूनअखेर 1159 कोटी रुपये एफ आर पी थकित असल्याचे समोर आले.
साखर आयुक्तालय यानेही ही बाब गंभीर घेऊन कारखान्यांना एफआरपी देण्यासाठी नोटीस बजावली होती. त्यानुसार साखर कारखान्यांनीही या थकीत एफ आर पी ची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर ती त्वरित जमा केली आहे

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here