लोकसभा मतदानापूर्वी थकीत ‘एफआरपी’ मिळणार?

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

पुणे : चीनी मंडी

महाराष्ट्रात साखर हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी, अद्याप साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे एफआरपीचे पैसे दिलेले नाहीत. राज्यातील साखर कारखानदारांकडून लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी उसाचे पैसे देऊ, असे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली आहे.

राज्यात यंदा १९३ साखर कारखान्यांमध्ये ऊस गाळप सुरू होते. त्यात ९० हजार ५२३ लाख टन ऊस गाळप झाले आहे. या ऊस बिला पोटी कारखान्यांकडून एफआरपीचे १९ हजार ६२३ कोटी रुपये देय होते. त्यातील जवळपास १४ हजार ८८१ कोटी रुपये कारखान्यांकडून शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. तर, अद्याप ४ हजार ७४२ कोटी रुपये थकबाकी आहे.

महाराष्ट्रात ऊस अडीच कोटी नागरिकांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. देशातील ऊस नियंत्रण कायद्यानुसार कारखान्याला ऊस दिल्यानंतर पुढच्या १४ दिवसांत त्यांचे बिल शेतकऱ्यांना देणे कारखान्यांसाठी बंधनकारक आहे. मात्र, तसे न झाल्यास थकीत रकमेवर वर्षिक १५ टक्के दराने कारखान्यांना व्याज द्यावे लागते.

राजकीय पार्श्वभूमी

महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साखर कारखाने आहेत. त्यातील जवळपास सर्व साखर कारखाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात आहेत. भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांचे कारखाने राज्याच्या इतर भागात असून, त्यांनीही साखर लॉबीमध्ये स्थान मिळवले आहे. त्यामुळे साखर कारखाने हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा कणा आहेत. असे असले तरी, उत्तर प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रात ऊस बिल थकबाकी हा यंदाच्या निवडणुकीचा विषय झालेला नाही.

यंदाच्या निवडणुकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी झगडणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीशी हातमिळवणी केली आहे. आम्ही अगदी निवडणुकीच्या पूर्वीही सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात आंदोलने केली आहेत. आता गरज पडली तर, आम्ही पुन्हा शेतकऱ्यांसाठी रस्त्यांवर उतरू, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रमुख आणि हातकणंगलेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

दरम्यान, थकीत एफआरपीप्रकरणी राज्यातील ४९ साखर कारखान्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. यात कारखान्यांची साखर आणि तर जंगम मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. राज्यात हंगाम संपण्यापूर्वी शेतकऱ्यांची ९० टक्के एफआरपी खात्यावर जमा झालेली असेल, असा विश्वास साखर आयुक्त गायकवाड यांनी व्यक्त केला.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here