एफआरपी दोन टप्प्यात देणार

589

कोल्हापूर, ता. 21

साखरेचे दर घसरत आहेत. त्यामुळे एक रक्कम एफआरपी देणे मुश्लिक झाले आहे. त्यामुळे एफआरपीची पहिली उचल 2400 रुपये व उर्वरित रक्कम ठराविक दिवसाने द्यावी, यासाठी आज (शुक्रवार) दुपारी अडीच ला येथील एका खासगी हॉटेलमध्ये साखर कारखानदारांची बैठक़ होणार आहे. यामध्ये, कारखान्यांचे प्रतिनिधी आपआपल्या कारखान्याची भूमिका मांडणार असून अडचणीत आलेल्या साखर उद्योगासाठी केंद्र व राज्य शासनाने मदत करावी, अशीही मागणी केली जाणार आहे.

यावर्षीचा गळीत हंगामाची सुरूवात कोणत्याही आंदोलनाशिवाय झाली. आंदोलन होण्याआधी एक रकमी एफआरपी देण्याचा निर्णय झाला होता. हा निर्णय मान्य करून शेतकरी संघटनेने आपले आंदोलन मागे घेतले होते. दरम्यान, आता साखरेला दर नाही. साखरेची उचल होत नाही. साखरेचे किमान दर वाढवावेत अशी मागणी केली होती. मात्र ती पूर्ण केली नाही. आज एक महिना उलटला तरीही एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावल यांनी सर्व कारखान्यांना नोटीसा बजावल्या आहेत. यापार्श्वभूमीवर ही बैठक घेतली जात असल्याचे समजते.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here