इंधन कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी

तेल वितरण कंपन्यांनी शुक्रवारी सकाळी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. कंपन्यांनी इंधन दरात कोणताही बदल केलेला नाही. या वर्षाच्या सुरुवातीला इंधन दराने मोठी उसळी घेतली. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून दर स्थिर आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये आणि डिझेल ८६.६७ रुपयांना मिळत आहे.

आयओसीएलच्या ताज्या किमतीनुसार मुंबईसह इतर महानगरांत पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल झालेला नाही. मुंबईत पेट्रोल १०९.९८ रुपये प्रती लिटर तर डिझेल ९४.१४ रुपये प्रती लिटर आहे. तर चेन्नईत पेट्रोल १०० रुपयांवर आहे. येथे पेट्रोल १०१.४० रुपये प्रती लिटर तर डिझेल ९१.४३ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये पेट्रोल १०४.६७ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ८९.७९ रुपये प्रती लिटरने मिळत आहे. याशिवाय युपीची राजधानी लखनौमध्ये पेट्रोल ९५.२८ रुपये तर डिझेल ८६.८० रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात. फक्त एक एसएमएस करून हे दर आपण जाणून घेऊ शकतो. केंद्र आणि राज्य सरकारांकडून वसूल केल्या जाणाऱ्या टॅक्समुळे हे इंधन सर्वसामान्यांना महाग दराने मिळते. पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलत असतात. सकाळी सहा वाजता हे दर बदलले जातात. पेट्रोल-डिझेलचा दर तुम्ही SMS च्या माध्यमातूनही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP लिहून शहराच्या कोड नंबरसह ९२२४९९२२४९ या क्रमांकावर मेसेज पाठवून दराची माहिती घेऊ शकतात.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here