नवी दिल्ली : या आठवड्याची सुरुवात पेट्रोल आणि डिझेलच्या स्थिर दरांनी झाली आहे. तेल कंपन्यांनी सोमवारी, २६ जुलै रोजी पेट्रोल, डिझेलचे नवे दर जारी केले. सलग नवव्या दिवशी इंधनाचे दर स्थिर आहेत. त्यामुळे देशाची राजधानी नवी दिल्लीत पेट्रोल १०१.८४ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ८९.८७ रुपये प्रती लिटर या दराने विक्री करण्यात येत आहे.
मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या तीन बड्या महानगरात पेट्रोल दर अनुक्रमे १०७.८३ रुपये, १०२.४९ रुपये आणि १०२.०८ रुपये प्रती लिटर आहे. अशाच पद्धतीने दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे डिझेलचा दर अनुक्रमे ८९.८७, ९७.४५, ९४.३९ आणि ९३.०२ रुपये प्रती लिटर आहे. यापूर्वी रविवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग आठव्या दिवशी कोणताही बदल केला नव्हता. तेल उत्पादनात झालेली वाढ आणि अमेरिकेतील संशोधन या दोन बाबींमुळे इंधन दराची वाढ तुर्त रोखली गेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती दहा टक्क्यांनी घसरुन ६९ डॉलर प्रती बॅरलवर आल्या आहेत. यापूर्वी त्या ७७ डॉलर प्रती बॅरलवर होत्या. सद्यस्थितीत ब्रेंट क्रुड ७२ डॉलर प्रती बॅरल आहे. गेल्या काही दिवसांपासून कच्या तेलाचे दर मजबूत झाले आहेत. त्यामुळे तेल कंपन्यांनी दर स्थिर ठेवले आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link