इंधन दरात तिसऱ्या दिवशीही उसळी, पेट्रोल, डिझेल पुन्हा महागले

27

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी आज, शनिवारी डिझेलच्या दरात ३० पैसे तर पेट्रोलमध्येही २५ पैसे प्रती लिटर वाढ केली. देशभरात आता पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत. दिल्लीत आता पेट्रोलचा दर १०२ रुपये प्रती लिटर झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्याने देशभरात पेट्रोल-डिझेलच्या महागाईचा भडका उडाला आहे. भारतीय तेल कंपन्यांनी आज, २ ऑक्टोबर रोजी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. देशांतर्गत बाजारपेठेत सरकारी तेल कंपन्यांनी आज, शनिवारी डिझेलच्या दरात ३० पैसे प्रती लिटर आणि पेट्रोलच्या दरात २५ पैसे प्रती लिटरची वाढ केली.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने जाहीर केल्यानुासर, इंधन दरातील वाढीनंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल १०२.१४ रुपये प्रती लिटर झाले आहे. शुक्रवारी पेट्रोलचा दर १०१.८९ रुपये प्रती लिटर होता. तर डिझेल ९०.४७ रुपये प्रती लिटरवर पोहोचले. मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, बिहार, बंगाल, जम्मू काश्मीर, दिल्ली-एनसीआर आणि पंजाबमध्ये पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर आहे. तर काही शहरांमध्ये पेट्रोल ११० रुपये प्रती लिटरवर आले आहे. मध्य प्रदेशातील सिवनीमध्ये पेट्रोल ११३.२८ पैसे प्रती लिटर आणि राजस्थानमधील श्रीगंगानरमध्ये ११३.०१ रुपये प्रती लिटर झाले आहे.

महानगरांमध्ये मुंबईत पेट्रोल-डिझेल सर्वात महाग आहे. मुंबईत पेट्रोल १०८.१५ रुपये तर डिझेल ९८.१२ रुपये प्रती लिटरवर पोहोचले आहे. तर चेन्नईत पेट्रोल ९९.७६ रुपये आणि डिझेल ९४.९९ रुपये प्रती लिटर दराने विक्री केले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०२.७४ रुपये आणि डिझेल ९३.५४ रुपये प्रती लिटरवर पोहोले आहे.
दरम्यान सीएनजी-पीएनजीलाही महागाईचा तडाखा बसला आहे. नैसर्गिक वायूचा (सीएनजी) दर दिल्लीत शु्क्रवारी २.२८ रुपये प्रती किलो आणि घरांमध्ये पाइपलाइनद्वारे पोहोचवला जाणारा घरगुती गॅस २.१० रुपयांनी महागला. दिल्लीत सीएनजी २.२८ रुपये प्रती किलो तर नोएडा, ग्रेटर नोएडा तथा गाझियाबादमध्ये सीएनजी २.५५ रुपयांनी महागले. हे दर आज सकाळी सहा वाजता लागू झाले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here