अशोक साखर कारखान्यातर्फे संपूर्ण एफआरपी अदा

श्रीरामपूर : अशोक सहकारी साखर कारखान्याने २०२२-२३ च्या गाळप हंगामात गळीतास आलेल्या उसाची उर्वरित प्रतिटन २१३.६८ रुपये याप्रमाणे प्रतिटन २५७३.६८ रुपयांप्रमाणे दर दिला आहे. शेतकरी, सभासदांची १२.०३ कोटी इतकी देय रक्कम बँक खात्यात वर्ग केल्याची माहिती चेअरमन, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी दिली. मुरकुटे म्हणाले, २०२२-२३ गळीत हंगामास आलेल्या उसाला पहिला हप्ता २३६० रुपयांप्रमाणे दिला होता. आता दुसरा हप्ता २१३.६८ रुपये दिला आहे. कारखाना शेतकरी, सभासदांच्या हितासाठी कटिबद्ध असून आगामी हंगामात शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी पाठवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here