गडहिंग्लज साखर कारखाना कार्यालयाला आंदोलकांनी ठोकले टाळे

कोल्हापूर : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या कामगारांनी थकीत पगार आणि भविष्य निर्वाह निधीसाठी कारखाना कार्यस्थळावरील प्रशासकीय कार्यालयाला सोमवारी टाळे ठोकले. सोमवारी कामबंद आंदोलनाचा सहावा दिवस होता.

गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना व्यवस्थापन आणि कामगार यांच्यातील थकीत पगार, थकीत भविष्य निर्वाह निधी, हंगामी कामगारांचा रिटेन्शन अलाउन्स याबाबतची बोलणी फिस्कटल्याने ११ जुलै २०२३ पासून कामबंद आंदोलन सुरु आहे. हरळी येथील कार्यस्थळावरील अध्यक्ष- उपाध्यक्ष व कार्यकारी संचालकांचे दालन वगळता सर्व प्रशासकीय कार्यालयांना कुलूप लावण्यात आले. त्यामुळे खातेप्रमुख आणि अधिकारी दिवसभर व्हरांड्यात थांबले होते.

  मे २०२१ ते मे २०२३ अखेरचा कामगारांचा पगार थकीत आहे. ऑक्टोबर २०२० पासून मे २०२३ पर्यंतची कामगारांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरलेली नाही. हंगामी  कर्मचाऱ्यांना तीन वर्षांचा रिटेन्शन अलाउन्स आणि त्यावरील भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळालेली नाही. आर्थिक अडचणीत सापडलेल्या कामगारांना थकीत पगारापैकी ७ पगार आणि चालू हंगामातील थकीत पगारापैकी ५ पगार द्यावेत, भविष्य निर्वाह निधीची रक्कम तातडीने भरावी, हंगामी कामगारांचा वर्षाचा रिटेन्शन अलाउन्स द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी साखर कामगार संघाचे अध्यक्ष विजय रेडेकर, उपाध्यक्ष श्रीकांत नार्वेकर, अरुण शेरेगार, सुरेश कुब्बुरी, भाऊसाहेब पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here