कचर्‍याच्या आकड्यात होत आहे वाढ

औरंगाबाद : शहरातील कचरा संकलन आणि वाहतुकीच्या कामासाठी महापालिकेने काही महिन्यांपूर्वी बंगळुरु येथील पी. गोपीनाथ रेड्डी या खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. महापालिका कंपनीला प्रतिटन 1865 रुपये मोबदला देत आहे. कंपनीने फेब्रुवारी महिन्यापासून शहरात काम सुरु केले. कंपनीचे काम सुरु होण्यापूर्वी महापालिकेतर्फे शहरात साफसफाई काम केले जात होते. त्यानुसार प्रशासनाने साडेतीनशे  ते साडेचारशे टन कचरा निघतो, असा दावा वारंवार केंला, मात्र आता कंपनीकडे काम गेल्यापासून कचर्‍याचे आकडे दिवसेंदिवस वाढतच आहेत.

27 दिवसांचा विचार केल्यास दिवसाला तब्बल 511 मेट्रीक टन कचरा उचलण्यात आल्याचे या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. परतीच्या पवासाचा जोर वाढल्यानंतर कचरा ओला होवून वजन वाढल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे शहराच्या नउ प्रभागांपैंकी आठच प्रभागात कंपनी काम करते.  विशेष म्हणजे कचर्‍याच्या ट्रकचे वजन केले जाते. तेही खासगी एजन्सीच्याच वजन काट्यावर, घनकरा विभाग या वजनाच्या पावत्या गृहीत धरुन कंपनीला बिल अदा करीत आहे. पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीने ऑक्टोबर महिन्यात 13 हजार 798 मेट्रिक टन कचरा उचलल्याच्या पावत्या सादर केल्या आहेत.

घनकचरा व्यवस्थापनावर सध्या कोणाचे लक्ष नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कंपनीचा मनमानी कारभार सुरु असून, त्यात अधिकार्‍यांसोबत मिलीभगत असल्याचा आरोपही केला जात आहे. कचरा प्रक्रिया केंद्रावर अद्याप मिक्स कचरा येत असून, त्यात वजन वाढवण्यासाठी दगड, विटा, मातीही टाकली जात आहे. शहरात मिक्स कचर्‍याचे प्रमाण 50 टक्क्यांवर आहे. त्यामुळे कंपनीला दंड लावण्यात येईल, असे इशारे प्रशासनानेे वारंवार दिले, अद्याप दंड लावल्याचा एकही आकडा समोर आलेला नाही.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here