पेट्रोलचे दर पुन्हा भडकले, डिझेलही उच्चांकी स्तरावर

नवी दिल्‍ली : पेट्रोलच्या दरात सलग सातव्या दिवशीही वाढ सुरूच राहिली. दिल्लीत पेट्रोल ३५ पैसे प्रती लिटरने वाढून ११०.०४ रुपयांवर पोहोचले. तर डिझेलचा दर ९८.४२ रुपये प्रती लिटर झाला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचा दर वाढून ११५.८५ रुपये प्रती लिटर झाला असून डिझेल १०६.६३ रुपयांवर पोहोचले आहे. देशातील सर्व महानगरांत येथील दर सर्वोच्च स्तरावर आहेत.

देशभरात पेट्रोलच्या दरात ३५-४० पैसे प्रती लिटर वाढ झाली आहे. मात्र पेट्रोलियम उत्पादनांवरील स्थानिक करांच्या आधारावर विविध ठिकाणी दरात फरक आहे. गेल्या सहा दिवसांत इंधन दरात दररोज ३५ पैसे प्रती लिटरची वाढ करण्यात आली. दरम्यान, गेल्या ३९ दिवसांत डिझेलचे दर ३१ वेळा वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे दिल्लीत डिझेलचे दर प्रती लिटर १० रुपयांनी वाढले आहेत. डिझेलच्या दरवाढीनंतर देशाच्या काही भागात आता १०० रुपये प्रती लिटर दर झाला आहे. दिल्लीतही डिझेल शंभर रुपयांच्या जवळ पोहोचले आहे. सोमवारी हा दर ९८.४२ रुपये प्रती लिटरवर पोहोचला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here