गौतम अदानींची घोषणा : उत्तर प्रदेशमध्ये करणार ७०,००० कोटींची गुंतवणूक, ३०,००० लोकांना मिळणार रोजगार

लखनौ ः गौतम अदानी ग्रुप आता उत्तर प्रदेशात ७०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. उत्तर प्रदेश इन्व्हेस्टर्स समिट २०२२ मध्ये (Uttar Pradesh Investors Summit 2022) अदानी यांनी याची माहिती दिली आहे. ते म्हणाले, आम्ही राज्यात ७०,००० कोटी रुपयांहून अधिकची गुंतवणूक करणार आहोत. त्यापासून सधारणतः ३०,००० हून अधिक लोकांना रोजगार मिळतील अशी अपेक्षा आहे. या इन्व्हेस्टर्स समिटला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.

लाइव्ह हिंदूस्थान डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, गौतम अदानी यांनी घोषणा केली की अदानी समूह उत्तर प्रदेशात ७०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. यातून भारताच्या सर्वात जास्त लोकासंख्येच्या राज्यात ३०,००० नोकऱ्यांची निर्मिती होईल. अदानी युपी इन्व्हेस्टर्स समिटमध्ये बोलत होती. याचे आयोजन लखनौमध्ये करण्यात आले होती. इन्व्हेस्टर्स समिटमध्ये अदानी म्हणाले की,अदानी समूह राज्यातील रस्ते आणि वाहतुकीमधील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी २४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे तिसऱ्या उत्तर प्रदेश गुंतवणूकदार संमेलनाच्या पायाभरणी समारंभात राज्यातील ८०,००० कोटी रुपयांहून अधिक १४०६ योजनांची कोशनीला बसवली. या योजनांमध्ये कृषी आणि संबंधीत क्षेत्र, आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स, MSME, मॅन्युफॅक्चरिंग, रिन्युएबल एनर्जी, फार्मा, पर्यटन, संरक्षण तथा एअरोस्पेस, हस्तकला तथा कापड अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे. या कार्यक्रमात देशातील उद्योग जगतातील दिग्गज सहभागी होते. आदित्य बिर्ला समुहाचे कुमार मंगलम बिर्ला, हिरानंदानी समुहाचे निरंजन हिरानंदानी आदींचा यात समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here