गौतम अदानींचा नवा विक्रम, बनले जगातील द्वितीय क्रमांकाचे सर्वात मोठे अब्जाधीश

नवी दिल्ली : अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांनी एक महिन्यापेक्षा कमी काळात आणखी एका अब्जाधिशांना मागे टाकले आहे. ते आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहे. फोर्ब्स रिअल टाइम्स बिलेनिअर्सच्या माहितीनुसार १५५.५ अब्ज डॉलर संपत्तीसह गौतम अदानी यांनी हा टप्पा गाठला आहे. त्यांनी फ्रान्सचे व्यावसायिक बर्नार्ड अरनॉल्ट यांनाही मागे टाकले आहे. मात्र, ब्लुमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार ते १४९ अब्ज डॉलर संपत्तीसह आजही जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.

टाइम्स नाऊ हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, पहिल्यांदाच एखादी भारतीय व्यक्ती ब्लुमबर्ग बिलेनिअरच्या यादीत या स्थानावर पोहोचली आहे. आता अदानी यांच्यापुढे फक्त टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलन मस्क आहेत. ब्लुमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसर अदानी अशा पाच अब्जाधिशांपैकी एक आहेत, ज्यांची एकूण संपत्ती १०० अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. त्यांच्याशिवाय इलन मस्क, जेफ बेजोस, बर्नार्ड अरनॉल्ट आणि बिल गेट्स हे १०० अब्ज डॉलरपेक्षाही अधिक संपत्तीचे मालक आहेत. फोर्ब्सनुसार शुक्रवारी ६० वर्षीय गौतम अदानी यांची संपत्ती ५.२ अब्ज डॉलर अथवा ३.४९ टक्के वाढली आहे. अदानी ग्रुपच्या शेअर्सनी घेतलेल्या उसळीमुळे ही संपत्ती वाढली आहे. तेल आणि नॅचरल गॅसच्या किमतीत वाढ झाल्याने अदानी ग्रुपच्या अध्यक्षांच्या एकूण संपत्तीत ७० अब्ज डॉलरहून अधिक नफा झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here