गौतम अदानी अंबुजा सिमेंटद्वारे ग्रीन पॉवरमध्ये करणार 6000 कोटींची गुंतवणूक

मुंबई : गौतम अदानी यांच्या कंपनीने आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आणखी एका मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. 600 कोटी रुपयांची ही गुंतवणूक अंबुजा सिमेंटद्वारे ग्रीन पॉवरमध्ये केली जाईल, ज्याचे लक्ष्य 1,000 मेगावॅट क्षमता निर्माण करण्याचे आहे. अंबुजा सिमेंटच्या माध्यमातून ही गुंतवणूक गुजरात आणि राजस्थानमधील सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांत होणार आहे.

अंबुजा सिमेंटने सोमवारी एका फाइलिंगमध्ये सांगितले की, कंपनी गुजरातमध्ये 600 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प, 150 मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्प आणि राजस्थानमध्ये 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पात 6,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यातून 1000 मेगावॅट वीज निर्माण होईल. कंपनीकडून आर्थिक वर्ष 2026 पर्यंत हे लक्ष्य साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

विजेचे दरही कमी होतील…

हरित ऊर्जेमुळे उत्पादन खर्च कमी होण्याबरोबरच विजेचा खर्चही कमी होईल, असे कंपनीने म्हटले आहे. यामुळे विजेची किंमत 6.46 रुपये प्रति kWh वरून 5.16 रुपये प्रति kWh पर्यंत कमी होईल. सिमेंट बिझनेसचे सीईओ अजय कपूर म्हणाले की, आम्ही आमचे लक्ष्य मुदतीपूर्वी गाठणार आहोत. हरित ऊर्जेमुळे ग्रीन सिमेंटचा पुरवठा वाढण्यासही मदत होईल, असेही ते म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here