लातूर : रेणा सहकारी साखर कारखान्याची आधिमंडळाची २१ वी वार्षीक सर्वसाधारण सभा बुधवारी दि.२७ सप्टेबर रोजी कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांच्या उपस्थितीत लातूर येथील विश्व पॅलेस मंगल कार्यालय, डी मार्ट जवळ रिंग रोड येथे आयोजीत करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. या सभेत मागील गळीत हंगामात सर्वाधिक ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकरी सभासदाचा गौरव करण्यात येणार आहे.
कारखान्याचे संस्थापक तथा माजी मंत्री दिलीपराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत व कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी २ वाजता सभा आयोजीत करण्यात आली आहे. या सभेत गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये सर्वाधिक ऊस पुरवठा करणारे सभासद, ऊस तोडणी व वाहतूक करणारे ठेकेदार, हार्वेस्टरव्दारे तोडणी व वाहतूक करणारे ठेकेदार यांचा पारितोषिक देऊन कारखान्याच्या वतीने प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. सभासदांसाठी ‘सहकार प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी सभासद व नागरीकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मारे, व्हा. चेअरमन अनंतराव देशमुख व कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे व सर्व संचालक मंडलांच्यावतीने करण्यात आले आहे