‘सहकार महर्षी’च्या सर्वसाधारण सभेत इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणास मंजुरी

सोलापूर : सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांकडून ऊस गाळप क्षमता वाढीसह इथेनॉल प्रकल्पाच्या सुमारे दीडशे कोटींच्या विस्तारीकरणाला एकमुखी मंजुरी देण्यात आली. सर्वसाधारण सभेत कारखान्याची गाळप क्षमता ७५०० मेट्रिक टनावरून १०५०० मेट्रिक टन करण्यासाठी सुमारे ८२ कोटी तर इथेनॉल निर्मितीसाठी सुमारे ६९ कोटी ६२ लाख रुपये तर ५ कोटीच्या रूफ टॉप सोलर प्रकल्पास मंजुरी देण्यात आली. सर्वसाधारण सभा चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

यावेळी चेअरमन जयसिंह मोहिते पाटील म्हणाले, सहकार महर्षी कारखान्याने स्थापनेपासूनच शेतकरी सभासदांचे हिताचे निर्णय घेतले असून दुष्काळ, पूर व कोरोना यासारख्या आपत्तीत मदतीचा हात पुढे करून सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे. ऊस उत्पादकांना चांगला दर देता यावा यासाठी विस्तारीकरण करण्यात येत आहे. कारखाना बंद काळात महावितरणऐवजी स्वतःची वीज वापरता यावी यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात येणार आहे. फक्त साखर उत्पादन घेऊन सभासदांना जादा दर देता येणार नाही. त्यासाठी भविष्याचा विचार करून इथेनॉल निर्मितीवर भर देणे गरजेचे आहे.

यावेळी बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील, ‘शंकर’चे उपाध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, ‘शिवामृत’चे व्हा. चेअरमन दत्तात्रय भिलारे, शंकरराव माने-देशमुख, रामचंद्र सावंत, प्रकाशराव पाटील, सुरेश मेहेर उपस्थित होते. कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी विषय वाचन केले. कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here