जर्मनी: चालू हंगामात साखर उत्पादन वाढण्याचे अनुमान

हॅम्बर्ग : २०२१-२२ या हंगामात जर्मनीत बीटपासून रिफाइंड साखरेचे उत्पादन गेल्या हंगामातील ४.१० मिलियन टनावरुन वाढून ४.४८ मिलियन टन होण्याची शक्यता जर्मन उद्योग असोसिएशन डब्ल्यूव्हीझेडने नवीन पिक अनुमानात व्यक्त केली आहे. सप्टेंबरमध्ये व्यक्त केलेल्या ४.३८ मिलियन टनच्या पूर्व अनुमानपेक्षा हे उत्पादन अधिक असेल.

असोसिएशनने सांगितले की, जर्मनीतील शेतकऱ्यांनी नवीन हंगामासाठी ३,५४,००० हेक्टर बिटची लागवड केली आहे. गेल्या हंगामात ही लागवड ३,५०,००० हेक्टरवर होती. २०२१-२२ या हंगामात २८.९७ मिलियन टन बिटचे गाळप होईल असा अंदाज आहे. गेल्या हंगामात २५.७२ मिलियन टन गाळप झाले होते. बिटचे सरासरी उत्पादन ८१.८ टन प्रती हेक्टर आहे. गेल्या हंगामात ते ७३.३ टन होते. या हंगामात बीट साखरेचे सरासरी प्रमाण १७.५ टक्के राहण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात हे प्रमाण १७.९ टक्के होते. यावर्षी पावसामुळे बिटला फायदा झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here