पेट्रोल, डिझेलच्या दराचे नवे अपडेट्स, जाणून घ्या दर

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज, आठवड्यातील तिसऱ्या दिवशीही, बुधवारीही दिलासा मिळाला. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दर वाढविण्यात आलेले नाहीत आणि कमीही झालेले नाही. पेट्रोलियम कंपन्यांकडून आज, सलग ५० व्या दिवशीही दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ८६.६७ रुपये प्रकी लिटर आहे. अशाच पद्धतीने देशाची आर्थिक राजधानी मुंबईत १०९.९८ रुपये प्रती लिटर पेट्रोल आणि डिझेल ९४.१४ रुपये प्रती लिटर आहे.

कोलकातामध्ये पेट्रोल १०४.६७ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ८९.७९ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे. तर चेन्नईत पेट्रोल १०१.४० रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९१.४३ रुपये प्रती लिटर दराने उपलब्ध आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलतात. सकाळी सहा वाजता ते अपडेट केले जातात. पेट्रोल डिझेलचे नवे दर तुम्ही SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP यासोबत आपल्या शहराचा कोड नंबर लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करू शकतात. BPCLचे ग्राहक RSP लिहून ९२२३११२२२२ या क्रमांकावर मेसेज करून माहिती मिळवू शकतात. तर HPCL चे ग्राहक HPPrice लिहून ९२२२२०११२२ या क्रमांकावर मेसेज पाठवून दर जाणून घेऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here