गाजियाबाद जिल्हा प्रशासनाकडून साखरेसह आवश्यक वस्तूंच्या किंमती ‘फिक्स’

गाजियाबाद(उत्तरप्रदेश): लॉक डाउन मुळे अनेक ठिकाणी अधिक दराने आवश्यक वस्तूंची विक्री होत आहे, याबाबत प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे.

लॉकडाउन चा गैरफायदा घेऊन आवश्यक वस्तू अधिक दराने विकणाऱ्या दुकानदारांच्या तपासणी बरोबरच गजियाबाद जिल्हा प्रशासनाने 21 वस्तूंचे दर फिक्स केले आहेत. या वस्तूंमध्ये साखर, डाळ, तेल, तांदूळ, मीठ, मोहरीचे तेल आणि इतर मसाले यांचा समावेश आहे.

सिटी मजिस्ट्रेट शिव प्रकाश शुक्ला म्हणाले, या 21 वस्तू लूज पैकेट मध्ये विकल्या जातात आणि रिटेल आणि होलसेल विक्रेते जिल्हा प्रशासनाकडून निर्धारित केलेल्या किमतीशिवाय अधिक पैसे घेणार नाहीत.

सूचीनुसार, एक किलो साखर होलसेल मध्ये 37 तर रिटेल मध्ये 39 रुपये विकली जावी. रिफाइंड तेल होलसेल मध्ये 93 रुपये लीटर आणि होलसेल मध्ये 96 रुपये लीटर आहे. याप्रमाणे बासमती तांदूळ 60 रुपये प्रति किलो (होलसेल) आणि 65 रुपये प्रति किलो ( रिटेल ) असा दर निश्चित केला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here