गाझीपूर: नंदगंज साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनाची मागणी

कासिमाबाद : किसान सभेच्या २५ व्या राज्य संमेलनात बंद पडलेला नंदगंज साखर कारखान्यासह बडौलातील कताई मिल पु्न्हा सुरू करण्याचा मुद्दा उपस्थित केला जाईल, असे किसान सभेचे प्रदेश महामंत्री तथा माजी आमदार राजेंद्र यादव यांनी कासिमाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले. केंद्र तसेच राज्य सरकार आतापर्यंत शेतकरी विरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिव्हा मुख्यालयात आठ ते दहा जून या कालावधीत लंका मैदानात उत्तर प्रदेश किसान सभेचे राज्य संमेलन होणार असल्याची माहिती यादव यांनी दिली. ते म्हणाले की, शेतकरी शेती क्षेत्रातील गंभीर संकटाशी झुंज देत आहेत. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानंतरही अन्नदाता संकटात आहे. शेतकरी आत्महत्या करण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. केंद्र आणि राज्य सरकार केवळ घोषणाबाजी करीत आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन समाप्त होऊन एक वर्ष उलटले असले तरी आश्वासने पूर्ण झालेली नाहीत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here