कृषी सन्मान निधी योजनेचा फायदा देशाच्या सर्व शेतक-यांना

630

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

नवी दिल्ली 03 जून : मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या कार्यकाळात मोदी सरकारच्या पहिल्या बैठकीमध्ये शेतक-यांना भेट देण्यात आली. पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजनेचा फायदा देशाच्या सर्व शेतक-यांना मिळणार आहे तसेच लहान शेतकऱ्यांसाठी पेंशन योजना सुरू करावी असा निर्णय घेण्यात आला आहे.

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीमध्ये दोन निर्णय घेण्यात आले. सरकारने आधी दोन हेक्टरपर्यंत जमीन धारण करण्याऱ्या शेतक-यांना पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजनेचा फायदा देण्याचा निर्णय घेतला होता परंतु आता सर्व शेतक-यांना ह्याचा फायदा मिळणार आहे.

कॅबिनेटच्या बैठकीनंतर कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पत्रकारांना सांगितले की, पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत शेतक-यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. प्रत्येक चार महिन्यांत शेतक-यांना 2,000 रुपये देण्यात येत आहेत. आता याच्यामध्ये असलेल्या मर्यादा काढण्यात आल्या आहेत, आणखीन सर्व शेतक-यांना याचा लाभ मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here