शेतकऱ्यांना शंभर टक्के ऊस बिले द्या : जिल्हाधिकारी

शामली : जिल्हाधिकारी जयजित कौर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या ऊस बिलांबाबत बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये प्रत्येक साखर कारखान्याची थकबाकीबाबत माहिती घेतली.
जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी सांगितले की, शामली कारखान्याकडे ३६६.४६ कोटी रुपयांपैकी १५९.६४ कोटी रुपये दिले आहेत. तर ऊन साखर कारखान्याने ३३७.१० कोटी रुपयांपैकी १७१.६९ आणि थानाभवन कारखान्याने ४३९.३९ कोटी रुपयांपैकी १३५.६८ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. बैठकीत गळीत हंगाम २०२०-२१ यामधील ऊस बिले देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले. उर्वरीत ऊस बिले तातडीने देण्याचे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ऊस बिल देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कारखान्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला. बैठकीत जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादुर सिंह, शामली कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. बी. खोकर, कुलदीप पिलानिया, महा व्यवस्थापक विजित जैन, थाना भवन कारखान्याचे जे. बी. तोमर, सुभाष बहुगुणा, ऊन कारखान्याचे महा व्यवस्थापक अनिल कुमार अहलावत आदी उपस्थित होते.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here