इंधन दर कमी करून पॅकेज द्या: वाहतूकदारांची हरियाणा सरकारकडे मागणी

गुरुग्राम: इंधनाचे वाढते दर आणि वाहतूक क्षेत्राला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याबाबत राज्य सरकारकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत ट्रक चालक आणि वाहतुकदारांनी निदर्शने केली. वाहतूकदारांनी भारत ट्रक अँड ट्रान्सपोर्ट वेल्फेअर असोसिएशनच्या नेतृत्वाखाली राज्य आणि केंद्र सरकारकडे मदतीच्या पॅकेजची मागणी केली आहे.

इंधनाच्या वाढत्या किंमतीविरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी नव्या मोटार वाहन अधिनियमांअंतर्गत भरमसाठ दंड आकारणी आणि पोलीस, जिल्हाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या त्रासाबाबत सरकारवर जोरदार टीका केली. सध्या जवळपास ९० टक्के वाहने रस्त्यावरच उभी आहेत. परिस्थिती अतिशय बिकट आहे. ट्रक चालकांना डिझेलचे वाढते दर, बँकांचे हफ्ते आणि वाढत्या करांशी झुंज द्यावी लागत आहे असे आंदोलकांनी सांगितले.

असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष रणवीर सिंह यांनी संगितले की, आम्ही वाहतूकदारांच्या बिघडत्या परिस्थितीबाबत चर्चेसाठी सर्व ट्रक चालक आणि मालकांची बैठक आयोजित केली होती. कोविड १९च्या दुसऱ्या लाटेमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आम्ही प्रचंड आर्थिक संकटात आहोत. इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. त्याशिवाय वाहतूक नियमांतील दंडात केलेल्या वाढीमुळे पूर्वीपेक्षा दहा पट आर्थिक फटका बसत आहे. जर सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर देशभरात चक्का जाम आंदोलन केले जाईल असा इशारा वाहतूकदारांनी दिला.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here