जगात असेल ४० लाख साखरेचा तुटवडा

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

साओ पाऊलो (ब्राझील) : चीनी मंडी

जागतिक बाजारात पुढील २०१९-२०च्या हंगामात साखरेचा तुटवडा जाणवण्याची शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात आली आहे. आता मात्र, हा तुटवडा खूप मोठा जाणवेल, अशी शक्यता साखर उद्योगातील बड्या कंपन्यांना वाटू लागली आहे. फ्रान्समधील साखर उद्योगातील एका बड्या कंपनीने जागतिक बाजारात ४० लाख टन साखरेचा तुटवडा जाणवण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, भारत, थायलंड आणि युरोपिय महासंघात साखरेचे उत्पादन घटणार आहे. त्यापार्श्वभूमीवर जागतिक बाजारात साखरेचा तुटवडा जाणवेल. ब्राझीलमध्ये झालेल्या एका जागतिक परिषदेत ही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

थायलंडमध्ये पुढील हंगामात साखरेचे उत्पादन १० टक्क्यांनी घसरणार आहे. तेथील शेतकरी ऊस सोडून इतर पिकांकडे वळल्यामुळे साखर उत्पादन १२० लाख टनाच्या आसपास खाली येईल. थायलंड सरकारने जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांनुसार साखरेच्या क्षेत्रातील अनुदानामध्ये काही बदल केले आहेत. त्यानंतर तेथील बाजारात साखरेचा दर २० टक्क्यांनी घसरला आहे, अशी माहिती एका व्यापाऱ्याने दिली.

भारतात २०१९-२० या हंगामात साखर उत्पादन २६० ते २७० लाख टनाच्या आसपास होईल. तेथे ३१७ लाख टनावरून २६० लाख टनापर्यंत उत्पादन घसरणार आहे. उसाला पोषक वातावरण नसल्याने तेथील ऊस क्षेत्र कमी होत आहे. त्याचा हा परिणाम असल्याचे परिषदेमध्ये सांगण्यात आले. युरोपमध्येही परिस्थिती तशीच आहे. तेथील शेतकरी बिटाच्या ऐवजी इतर पिकांची शेती करू लागल्याने युरोपमधील साखर उत्पादनही घटणार आहे. व्यापाऱ्यांच्या अंदाजानुसार युरोपमध्ये साखर उत्पादन पाच टक्क्यांनी घटणार आहे, असेही परिषदेत सांगण्यात आले.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here