जागतिक बाजारात तेलाचे भाव पुन्हा घसरले

535

सिंगापूर : चीनी मंडी

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव गुरुवारी पुन्हा घसरलेतेलाचा पुरवठा वाढल्यामुळे दराची घसरण सुरू झाली आहेत्याचबरोबर अनेक अर्थव्यवस्था मंदावत असल्यामुळे तेलाचा खपही कमी होण्याची शक्यता आहेत्याचा एकत्रितपरिणाम तेलाचे भाव गडगडण्यावर होताना दिसत आहे.

बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलचा दर सध्या २४ सेंटसनी घसरून ६५.८८ डॉलर प्रति बॅरल (०.४ टक्के घसरण) असा आहे. तर, अमेरिकेच्या वेस्ट टेक्सास इंटरमिडिएटच्या कच्च्या तेलाचे दर, २९ सेंटसनी घसरून ५५.९६ डॉलर प्रति बॅरल (०.५ टक्क्यांचीघसरण) झाले आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून तेलाच्या दरांमध्ये घसरण सुरू झाली असून, आतापर्यंत जवळपास २५ टक्क्यांनी किंमत खाली आली आहे.

चीन हा जगातील सर्वांत मोठा तेल आयात करणार देश आहेतरकच्च्या तेलाचा दुसऱ्या क्रमांकाचा ग्राहक आहेसातत्याने मागणी कमी होत असल्यामुळे आम्ही आशिया खंडातील मोठे ग्राहक आणि रिफायनरीजशी चर्चा केल्याचे एकाविश्लेषकाने सांगितलेतर२०१८च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये बदल झाले आहेतचीनची अर्थव्यवस्था खालावली आहेअजूनही अर्थव्यवस्थेचा हा आलेख खालावलेला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दरम्यानया आठवड्यातील आकडेवारीवर नजर टाकलीजपान आणि जर्मनीसारख्या बड्या औद्योगिक देशांच्या अर्थव्यवस्थेलाही तिसऱ्या तिमाहीमध्ये मंदीला सामोरे जावे लागले आहेसध्याच्या घडीला अमेरिकेतील तेल उत्पादनात २२टक्क्यांनी वाढ झाली आहेया वर्षी रोज ११६ लाख बॅरल प्रमाणे अमेरिकेत तेल उत्पादन झाले आहेत्यामुळे बाजारात तेल पुरवठा वाढला आहेसध्याच्या घडीला पुरवठादार विकू शकतील यापेक्षाही जास्त बॅरल त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.

सध्याची तेलाची उपलब्धता पाहिलीतर २०१४मध्ये अतिरिक्त तेल पुरवठ्यामुळे तेलाची भाव मोठ्या प्रमाणावर घसरले होतेतशीच परिस्थिती पुन्हा ओढवलेअशी भीती व्यक्त होत आहेत्यामुळे तेल उत्पादक आणि निर्यातदार देशांनी(ओपीईसीपुरवठा कमी करण्याविषयी चर्चेला सुरुवात केली आहे.

 

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here