अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) ऑक्टोबर २०२१-सप्टेंबर २०२२ यांदरम्यान, १७४.६ मिलियन टन जागतिक साखर उत्पादन होईल असे अनुमान वर्तविले आहे. याबाबतचे वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिले आहे. २०२०-२१ च्या तुलनेत हे उत्पादन ५.१ मिलियन टन (३ टक्केझ) अधिक असेल. तीन वर्षाच्या घसरणीनंतर भारत, थायलंड आणि युरोपिय संघामध्ये उत्पादन वाढल्याने ही उत्पादन वाढीची शक्यता आहे. याचा थेट परिणाम जागतिक साखर उत्पादनावर दिसून येत आहे. जगातील सर्वात मोठा साखरेचा ग्राहक असलेला भारत आणि आफ्रिकन देश साखरेच्या खपाबाबत जागतिक वाढीला चालना देऊ शकतात.
२०२१-२२ मध्ये जागतिक साखर व्यापार ५९ मिलियन टन होण्याची शक्यता आहे. २०२०-२१ मधील व्यापाराच्या तुलनेत हे प्रमाण थोडे कमी आहे. भारताकडून उच्चांकी निर्यात आणि थायलंडकडील शिपमेंट मधील सुधारणांच्या अपेक्षेनंतरही ब्राझील कडून कमी निर्यातीमुळे जागतिक साखरेचा व्यापार कमी होण्याची शक्यता आहे.