मार्च-मे दरम्यान जागतिक तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता : WMO

नवी दिल्ली : जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) मते, अल निनो हळूहळू कमकुवत होत असला तरी मार्च ते मे महिन्यादरम्यान जागतिक तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. WMO ने म्हटले आहे कि, यंदा मान्सूनसाठी चांगली बातमी असू शकते, परंतु सध्या पावसाबद्दल काहीही भाकीत करणे खूप घाईचे होऊ शकते. कारण पावसाची स्थिती इतर हवामान घटनांवरदेखील अवलंबून असते, असे WMO ने म्हटले आहे.

WMO चे सरचिटणीस सेलेस्टे साऊलो म्हणाले की, जून २०२३ पासून प्रत्येक महिन्याने नवीन मासिक तापमानाचा विक्रम प्रस्थापित केला आणि २०२३ हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष होते. या विक्रमी तापमानाला एल निनो जबाबदार होता, असेही WMO ने म्हटले आहे.

एल निनोची स्थिती सरासरी दर दोन ते सात वर्षांनी तयार होते आणि साधारणपणे नऊ ते 12 महिने टिकते. हे जगाच्या विविध भागांतील हवामान आणि वादळाच्या स्थितीवर परिणाम करते. सध्याची एल निनोची स्थिती जून 2023 मध्ये विकसित झाली होती आणि डिसेंबर 2023 मध्ये शिखरावर पोहोचली. एल निनोची नोव्हेंबर 2023 ते जानेवारी 2023 दरम्यान सर्वात मजबूत स्थिती होती.

मार्च 2024 ते मे 2024 दरम्यान अल निनो कायम राहण्याची शक्यता सुमारे 60% आणि एप्रिल ते जूनमध्ये तटस्थ राहण्याची शक्यता 80% आहे, असे WMO ने म्हटले आहे. WMO ने म्हटले आहे कि, वर्षाच्या शेवटी ला निना विकसित होण्याची शक्यता आहे. ला नीनामुळे भारतीय उपखंडात चांगला पाऊस पडण्याची शक्यता असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here