आयान साखर कारखान्याचे कोणत्याही अडथळ्या शिवाय गाळप पूर्ण झाल्यामुळे ऊस शेतकऱ्यांचा जल्लोष

249

लहान शहादे : समशेरपूर येथील आयान मल्टीलिक्वीड अलाईड साखर कारखान्यांमार्फत नोव्हेंबर महिन्यात गळीत हंगामाला सुरुवात करण्यात आली होती. चार महिन्याच्या कालावधीत कारखान्यामार्फत तीन लाख टनापेक्षा अधिक ऊसाचे गाळप कण्यात आले. या कारखान्याचा हंगाम संपल्याने सर्वांनीच गुलालाच्या अधळणीत जल्लोष केला.

या कारखान्याला कोरीट, लहान शहादे, शिंदे, कोळदा, प्रकाशा यासह अन्य गावशिवारातील शेतकऱ्यांकडून ऊस देण्यात आला. या ऊसाच्या माध्यमातून कारखान्याने साखरेचे चांगले उत्पादन केल्याचे सांगण्यात येत आहे. ऊस तोडणीसाठी कारखाना परिसरात कन्नड, चाळीसगाव, मालेगाव, साक्री, धडगाव, शिरपूर व शिंदेखेडा, शहादा या तालुक्यांमधून ऊसतोड कामगार दाखल झाले होते. या गाळप हंगामात कारखान्याच्या ठिकाणासह कारखान्याच्या कार्यक्षेत्रात कुठलाही अनुचित प्रकार तथा घटना दिसून आली नाही.

कारखान्याचे सर्व कामकाज सुरळीत पार पडत हंगाम संपल्यामुळे ऊस वाहतुक करणाऱ्या अखेरच्या बैलगाडीचे पूजन करण्यात आले. कारखान्यात सर्व कामकाज चांगले झाल्यामुळे कारखान्यासाठी काम करणारे ऊसतोड कामगार, कारखान्यातील कामगार, शेतकरी यांच्यासह कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी गुलाल उधळत कारखान्याच्या आवारातच जल्लोष केला.

यावेळी गट पर्यवेक्षक विनोद मराठे, नितीन सोनवणे, निलेश पाटील, कांतीलाल मराठे, राजेश भिल, दीपक पटेल, वासुदेव पाटील, मुकादम रामलाल राठोड, धारासिंग चव्हाण, कारखान्याचे एम.डी. आर.सी. बडगुजर, मुख्य शेतकी आधिकारी ए.आर. पाटील, लेखापाल पद्माकर टापरे, सुरक्षा अधिकारी एन.डी. बागुल यांच्यासह सर्व कामगार सहभागी झाले होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here