सिद्धेश्वर कारखान्याच्या चेअरमनपदी ज्ञानेश्वर मोठे

छत्रपती संभाजीनगर : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी भाजपचे ज्ञानेश्वर मोठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. चेअरमन आणि व्हाइस चेअरमनपदासाठी ३ एप्रिल रोजी दुपारी कारखाना कार्यालयात निवडणूक घेण्यात आली. परंतु चेअरमन पदासाठी मोठे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची या पदासाठी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्वाचन अधिकारी एस. पी. काकडे यांनी जाहीर केले. मात्र, व्हाइस चेअरमन पदासाठी वेळेच्या आत एकही उमेदवारी अर्ज न आल्याने यापदाची निवड होऊ शकली नाही.

यावेळी मोठे यांचा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला .यावेळी रामदास हिवाळे, आबासाहेब जंजाळ, शंकर माने, दिलीप दानेकर, ज्ञानेश्वर मोठे, किरण पवार, सलीमखा मुलतानी, अप्पासाहेब साखरे, सुभाष सपकाळ, प्रभाकर इंगळे, अशोक साबळे, तारू अप्पा मेटे, जगन्नाथ दाढे, पुजाबाई रंगडे, जिजाबाई दाभाडे, पदमाबाई जीवरग, सुनील प्रसाद, विठ्ठल बकले यांची उपस्थिती होती तर, दीपक अपार, काकासाहेब फरकाडे, आबाराव सोनवणे हे संचालक मात्र गैरहजर होते. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here