गोवा: संजीवनी कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकबाकी अदा

41

फोंडा : संजीवनी सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकबाकी जारी केली आहे. एकूण ६७६ ऊस उत्पादक शेतकऱ्यांपैकी २४३ जणांना मोबदल्याची रक्कम मिळाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकात बदल केला आहे, त्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण, पीक बदल केलेल्या शेतकऱ्यांची पडताळणी सुरू आहे.

संजीवनी साखर कारखान्याशी संबंधीत ६७२ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी भेटच्या रुपात राज्य सरकाराने विशेष मदत योजनेंतर्गत उर्वरीत २० टक्के पैसे मंजूर केले आहेत. यापूर्वी मार्च महिन्यात ८० टक्के पैसे वितरीत करण्यात आले आहेत. कृषी संचालक नेविल अल्फोंसो यांच्याकडून आदेश जारी करण्यात आल्यानंतर सरकारने संजीवनी साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी २.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

कारखाना बंद झाल्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. अखिल गोवा ऊस उत्पादक शेतकरी संघाने ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत सरकारने भरपाईची रक्कम देताना शेतकऱ्यांकडून कारखान्याला पुरविलेल्या सर्वोच्च ऊस पुरवठ्याच्या प्रमाणाचा विचार करावा अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here