‘जयहिंद’कडून १५ डिसेंबरपर्यंतची बिले अदा : चेअरमन गणेश माने – देशमुख

सोलापूर : आचेगांव (ता. दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगर कारखान्याकडून यावर्षीच्या गळीत हंगामात १५ डिसेंबरपर्यंत ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केल्याचे चेअरमन गणेश माने- देशमुख यांनी सांगितले. १ जानेवारीपर्यंत जयहिंद शुगर कारखान्याने ४ लाख मेट्रिक टन इतका विक्रमी ऊस गाळप केला आहे. यामुळे कारखान्याचे चेअरमन गणेश माने-देशमुख व प्रेसिडेंट बब्रुवान माने-देशमुख यांनी कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांना एक दिवसाचे वेतन बक्षीस म्हणून जाहीर करण्यात आल्याचे कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. देशमुख यांनी सांगितले.

यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचा कारखान्याच्या वतीने कौतुक करण्यात आले. ऊस उत्पादक शेतकरी व उसतोड वाहतूक ठेकेदार तसेच कारखाना अधिकारी व कर्मचारी यांनी उर्वरित गळीत हंगामाला सहकार्य करून कारखान्यास सहकार्य करण्याचे आवाहन माने – देशमुख यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here