गोवा : Deccan Sugar Technologist’s Association कडून इथेनॉल प्रकल्पासाठी अहवाल सादर

पणजी : Deccan Sugar Technologist’s Association (DSTA) ने संजीवनी साखर कारखान्यात इथेनॉल प्लांट स्थापन करण्याबाबत विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर केला आहे. हा अहवाल २१ सदस्यांच्या ऊस उत्पादक शेतकरी सुविधा समितीचे अध्यक्ष नरेंद्र सावईकर यांना हा अहवाल सोपविण्यात आला आहे.

माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी सांगितले की, यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी राज्य सरकार आपल्या विभागाकडून या डीपीआरची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य सरकार धारबांदोडा येथे इथेनॉल प्लांट स्थापन करायचा की नाही याचा निर्णय घेईल.
तज्ज्ञांच्या टीमने डीपीआरचे खास सादरीकरण केले आणि त्यांनी डीपीआर दिला. तो आता सरकारला सादर केला जाणार आहे.

याबाबत द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सावईकर यांनी सांगितले की, आम्ही मूळ रुपात इथेनॉल उत्पादन करू इच्छितो. कारण केंद्र सरकारने याला पाठबळ दिले आहे. सावईकर म्हणाले की, जोपर्यंत आम्ही कारखान्यात उत्पादनविषयक घडामोडी करत नाही, संजीवनी साखर कारखाना तोपर्यंत ऊस शेतीचे समर्थन करणार नाही. जर राज्य सरकार पीपीपी तत्त्वावर इथेनॉल प्लांटसोबत पुढे जाणार असेल तर पुढील वर्षापर्यंत उसाचे उत्पादन सुरू होऊ शकेल. इथेनॉल उत्पादनासाठी नवी मशीनरी खरेदी करणे आणि स्थापन करण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी गरजेचा आहे असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here