गोवा: शेतकऱ्यांच्या ऊसाला मिळाला चांगला दर

पणजी: एकीकडे गोवा राज्यातील एकमेव संजीवनी साखर कारखाना बंद असल्याने हजारो शेतकरी हवालदिल आहेत. दुसरीकडे सुदुर कोटिगाओमधील उमेश गावकर हे सर्वसमान्य शेतकरी ऊस उत्पादकांसाठी तारणहार बनले आहेत. उमेश यांनी गूळ उत्पादनाचे युनीट सरू केले आहे. त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी सुरू केली आहे.
स्वतः शेतकरी असल्याने उमेश गावकर यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे दुःख माहिती आहे. त्यामुळे त्यांनी ऊस १००० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. सरकारने उसाचा दर ६५० रुपये क्विंटल निश्चित केला आहे.

उमेश यांनी यापुढे जाऊन शेतकऱ्यांना मदतीसाठी पावले उचलली आहेत. ऊसाच्या गाळपानंतर तयार होणारा कचरा त्यांनी शेजारील डेअरीच्या शेतकऱ्यांना मोफत दिला आहे. गावकर यांनी कोटिगाओमध्ये येड्डा वार्डमध्ये राहतात. त्यांनी एका रात्रीत गूळ उत्पादनाचे युनीट सुरू करण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्या या युनीटमुळे स्थानिक आठ शेतकऱ्यांना रोजगार मिळाला आहे. ते म्हणाले, माझ्या युनीटशी २० शेतकरी जोडले गेले आहेत. त्यांच्याकडे २०० टन ऊस उपलब्ध आहे. ते दररोज ६०० किलो गुळाचे उत्पादन करतात. जानेवारी महिन्यात त्यांनी हा गृह उद्योग सुरू केला. स्थानिक लोकांना मे अखेरपर्यंत ४-५ महिने इथे रोजगार मिळतो. या युनीटसाठी त्यांना ५ लाख रुपये खर्च आला आहे. आतापर्यंत आम्ही १५ लाखांचा व्यवसाय केल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here