गोवा: शेतकऱ्यांना ऊसाची तोडणी आणि वाहतुकीची प्रतीक्षा

संगुएम : काही महिन्यांपूर्वी गोवा सरकारने लेखी आश्वासन देऊनही शेतातील ऊसाची तोडणी आणि वाहतूक झाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केली आहे. वाडेम संगुएम येथील ऊस उत्पादक शेतकरी पौटो गावकर यांनी यावर्षी जानेवारी महिन्यात संगुएममध्ये झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाच दिवसांच्या आंदोलनाच्या आठवणींना उजाळा दिला. संजीवनी साखर कारखाना बेमुदत बंद पडल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. याबाबत सरकारने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते.

शेतकऱ्यांना सरकारकडून पाच वर्षांसाठी नुकसान भरपाई दिली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. तर फेब्रुवारीच्या अखेरीस ऊसाची तोडी आणि वाहतुकीसाठी एका ठेकेदाराची नियुक्ती करण्याचे सरकारने ठरवले होते. प्रत्यक्षात काहीच झाले नाही.

शेतकऱ्यांना अद्याप कोणत्याच प्रकारची मदत मिळाली नसल्याचे पौटो गावकर यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणावर शेतकरी आपल्या ऊसाच्या तोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. वाडेम संगुएम आणि जोनोडेम मोल्कोर्नम येथे ५० हून अधिक ठिकाणी ऊसाची तोडणी झालेली नाही. राज्य सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे.

जानोडेम मोल्कोर्नममधील शेतकरी जोसिन्हो डकोस्टा यांनी सांगितले की, शेतात कष्ट करून पिकवलेल्या उसाचे नुकसान होताना पाहणे दुर्दैवी आहे. सरकारने फेब्रुवारीत उसाची तोडणी आणि वाहतूक केली जाईल असे सांगितले होते. मात्र, ना ठेकेदार नियुक्ती झाली, ना अधिकाऱ्यांनी काही सांगितले असे डकोस्टा यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here