संजीवनी साखर कारखाना बंद होणार नाही: सरकार चे आश्‍वासन

गोव्यामध्ये उस उत्पादक शेतकरी संजीवनी साखर कारखाना बंद झाल्यामुळे संतापलेले आहेत. राज्य सरकार त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. 2 ऑगस्टला सरकार ने ऑल गोवा शुगरकेन प्रोड्यूसर्स असोसिएशन ला सांगितले कि, कारखाना बंद होणार नाही आणि उस गाळप हंगाम सुरु होण्यात उशिर होईल, पण सरकार शेतकरी आणि उस उत्पादनाकडे लक्ष ठेवेल.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, या ऋतुमध्ये उस उत्पादन करणार्‍यांचं नुकसान होणार नाही. या शेतकर्‍यांना सरकार समर्थन मूल्य प्रदान करण्याबरोबरच, सरकार त्यांचा उसही विकत घेणार आहे आणि इतर राज़्यांमध्ये साखर कारखान्यांनाही पुरवणार आहे.

विधायक प्रसाद गोनकर यांच्या नेतृत्वाखाली उस उत्पादकांच्या प्रतिनिधी मंडळाने शुक्रवारी विधानसभा परिसरात सीएम सावंत यांची भेट घेतली आणि उस शेतकर्‍यांची व्यथा कथन केली. गोव्यात असणार्‍या एकुलत्या एक संजीवनी साखर कारखान्यावर अनेक उस शेतकरी अवलंबून आहेत.

उसाची अनुपलब्धता आणि अनेक कारणांमुळे कारखान्याचे 101.22 करोड़ रुपयाचे नुकसान झाले आहे. कारखान्याची ही व्यवहार्यता पूर्ण झाल्यानंतर सरकार या कारखान्यासंदर्भात निर्णय घेईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here