गोवा: ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सरकारला आंदोलनाचा इशारा

223

पणजी : राज्य सरकारने जुनीच योजना लागू केल्याचा आरोप करत ऊस उत्पादक संघर्ष समितीच्या (यूयूएसएस) नेतृ्त्वाखाली शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सरकार नुकसान भरपाई देण्यात अपयशी ठरल्याचे म्हणणे शेतकऱ्यांचे आहे.

संघर्ष समितीचे उपाध्यक्ष चंदन उनंदकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि उप मुख्यमंत्री चंद्रकांत कावळेकर यांच्या निर्देशानुसार ६ जानेवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी आठ वर्षांतील स्थितीचा विचार करून शेतकऱ्यांना प्रति टन ३६०० रुपये भरपाई दिली जाईल असे आश्वासन दिले होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतांची सफाईही मोफत करण्याचे आश्वासनही सरकारने दिले होते असे उपाध्यक्ष उनंदकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here