गोवा: रस्ता बंद असल्याने ऊस वाहतूक अडचणीत

91

फोडा : अनमोड (गोवा) आणि रामनगर (कर्नाटक) यांदरम्यानचा मुख्य रस्ता बंद असल्याने कर्नाटकात होणारी ऊस वाहतूक अडचणीत आली आहे. अनमोडपासून खानापूरपर्यंत पर्यायी रस्त्यावरुन होणारी वाहतूकही सायंकाळी ६ ते सकाळी ६ या काळात बंद राहते. त्यामुळे जर एखादा ऊस वाहतूक करणारा ट्रक जर सायंकाळी ६ वाजल्यानंतर पोहोचला तर त्यांना अनमोड येथेच मुक्काम करावा लागतो अशी स्थिती आहे.

कर्नाटक सरकारकडून खानापूर पासून अनमोडपर्यंतच्या रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे अनमोडमधून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या वाहनांना अनमोडमधून खानापूरपर्यंत जंगलातील रस्त्याने जावे लागते. मात्र, हा रस्ता सायंकाळी सहा वाजता बंद केला जातो. सकाळी ६ वाजेपर्यंत रस्ता बंद राहात असल्याने रात्र तिथेच काढावी लागते. जर उसाचा ट्रक वेळेवर कारखान्यात पोहोचला, तर तो लवकर रिकामा केला जातो. त्यातून जादा मार्गावर वाहतूक करता येते. मात्र, रस्ता बंद असल्याने आणखी दहा किलोमीटरचा फेरा वाढला आहे. या परिसरातून आधीच खानापूर साखर कारखान्याला १९,९३२ टन ऊस पाठवला आहे. तर महाराष्ट्रातील चंदगड तालुक्यात आधी १४०० आणि ८८० टन ऊस गाळपास देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here