गोदावरी बायोरिफायनरीजचा सेबीकडे आयपीओसाठी प्रस्ताव दाखल

54

देशात अनेक कंपन्यांनी शेअर बाजारातील आयपीओमध्ये आपले स्वारस्य दर्शविले आहे. यामध्ये आता गोदावरी बायोरिफायनरीजचे नाव जोडले गेले आहे. प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार, गोदावरी बायोरिफायनरीजने आपल्या इनिशिअल पब्लिक ऑफरच्या माध्यमातून निधी जमविण्यासाठी बाजार नियामक सेबीकडे प्राथमिक प्रस्ताव दाखल केला आहे.

गोदावरी बायोरिफायनरीज ही देशातील प्रमुख इथेनॉल उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी देशातील इथेनॉलवर आधारित रसायनांच्या निर्मिती क्षेत्रात अग्रगण्य आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आयपीओ अंतर्गत कंपनी ३७० कोटी रुपयांचे नवे शेअर जारी करेल. याशिवाय, कंपनीचे प्रवर्तक तथा गुंतवणूकदार ६५,५८,२७८ इक्विटी शेअर्स विक्रीसाठी (ओएफएस) सादर करतील. गोदावरी बायोरिफायनरीज १०० कोटी रुपयांच्या प्री आयपीओ प्लेसटमेंटचा विचार करू शकते. तसे झाले तर फ्रेश इश्यूचा आकार कमी होईल.

देशात इथेनॉल उत्पादन क्षेत्रात अनेक कंपन्या गुंतवणूक करीत आहेत. केंद्र सरकारने क्रूड तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देत आहे. अनेक उद्योगांकडून देशात इथेनॉल प्लांट स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here