नवी दिल्ली : भारताचे शेजारी देश भुतानसोबत खूप चांगले संबंध आहेत. दोन्ही देश परस्पर रुपात लाभदायक भागिदारीला प्रोत्साहन देण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहेत. भारत सरकारने भुतानच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला सतत पाठबळ दिले आहे. भारताने कृषी आणि सिंचन विकास, आरोग्य, औद्योगिक विकास, रस्ते वाहतूक, ऊर्जा, नागरी उड्डाण, शहरी विकास, मानव संसाधन विकास, क्षमता निर्माण, शिक्षण, आणि संस्कृती अशा विविधांगी स्वरुपात भुतानला खास मदत केली आहे.
दोन्ही देशांमधील विशेष संबंधांचे संकेत देत भारत सरकारने १९ जुलै २०२२ रोजी भुतानला १०,००० टन साखर निर्यातीची अनुमती दिली आहे. देशात साखरेच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी साखर निर्यात १०० LMT पर्यंत मर्यादीत करण्यात आली आहे. १ जून २०२२ पासून हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
एक्स्पोर्ट रिलिज ऑर्डर पाहण्यासाठी इथे क्लिक करा.