सोने १५०० रुपयांनी स्वस्त

मुंबई : मागील आठवडाभरात देशातील कमॉडीटी बाजारात (एमसीएक्स) सोने १५०० रुपयांनी स्वस्त झाले असून सोन्याचा भाव ३९७८० रुपयांपर्यंत खाली आला आहे. मध्य-पूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने सोन्याच्या किमतींनी उसळी घेतली होती. ‘एमसीएक्स’मध्ये सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला ४१२९३ रुपयांवर गेला होता. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाने मध्य-पूर्वेत निर्माण झालेला तणाव निवळल्यानंतर जागतिक कमॉडीटी बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे.

सोन्याची नवी दिल्लीत ४०,६३४ रुपये दराची नोंद केली. मुंबईच्या सराफ बाजारात हा दर ३९,८८० रुपये नोंदवण्यात आला होतो. डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती सावरल्याने तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारातही सोनेदरात घट आल्याने देशांतर्गत सोन्याच्या किमतीत घसरण झाली. चांदीनेही सोनेदराची री ओढल्याने तिच्या दरात प्रतिकिलो १,१४८ रुपयांची घसरण झाली. नवी दिल्ली व मुंबई सराफ बाजारात चांदीचा दर अनुक्रमे ४७,९३२ व ४६,३७५ रुपये नोंदवण्यात आला होता.

जागतिक कमॉडीटी बाजारात सोने ०.४ टक्क्याने स्वस्त झाले असून भाव प्रती औंस १५५५.७६ डॉलरपर्यंत खाली आला आहे. चांदीच्या भावात ०.२ टक्के खाली आला असून तो १८.०५ डाॅलर आहे. सोने स्वस्त होण्यामागे आणखी एक कारण आहे. दीड वर्षांहून अधिक काळ सुरु असलेला अमेरिका आणि चीन यामधील व्यापारी तंटा मिटवण्यासाठी दोन्ही देशांनी पुढाकार घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here