कोविडच्या काळातही चांगली निर्यात, यंदा उच्चांक गाठणार: केंद्रीय मंत्री गोयल

देशात कोरोनाची दुसरी लाट अर्थव्यवस्थेसाठी घातक बनली. मात्र, महामारीच्या काळातही देशाची निर्यात अधिक चांगली झाली असे केंद्रीय मंत्री पियूष गोयलयांनी सांगितले. यंदा आम्ही निर्यातीमध्ये उच्चांक गाठू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईतील विविध निर्यातदारांच्या परिषदेच्या नेत्यांसोबतच्या बैठकीत ते बोलत होते.
प्रसार माध्यमातील वृत्तानुसार केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले, आम्ही सेवा क्षेत्रावर केंद्रीय वाणिज्य मंत्रालयात दोन विविध विभागांची स्थापना करीत आहोत. सेवा क्षेत्रासाठी ट्रिलियन अमेरिकन डॉलर उद्दीष्टपूर्तीसाठी प्रयत्न करायचे आहेत. दुबई एक्स्पोत निर्यातदारांना संधी शोधण्यासाठी चांगले वातावरण मिळेल. तेथे उपस्थिती लावण्यासाठी ईपीसीकडे आग्रह धरला जाईल.
ते म्हणाले, निर्यातीच्या संधीचा शोध घेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. आम्ही २०२२-२३ साठी चांगल्या निर्यातीचे उद्दीष्ट ठेवले आहे. या वर्षी निर्यातीचा उच्चांक होऊ शकेल. कोविडची स्थिती असूनही चांगली निर्यात झाली आहे. या वर्षी साडेचार महिन्यांत निर्यातीची आकडेवारी चांगली आहे. आगामी काळात ही स्थिती आणखी सुधारेल असे मंत्री गोयल यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here