बिहारच्या शेतकऱ्यांना खुशखबर, ऊस दरात बंपर वाढ; नीतीशकुमार यांनी केले ट्वीट

पाटणा : बिहार मधील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची खुशखबर आहे. राज्य सरकार आणि बिहार शुगर मिल्स असोसिएशनच्या मंजुरीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन २०२१-२२ या गळीत हंगामात ऊस दरात वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. ऊसाचा अति उच्च प्रजातीचा दर ३१५ रुपये प्रती क्विंटलवरुन वाढवून ३३५ रुपये प्रती क्विंटल करण्यात आला आहे. तर उच्च प्रजातीचा दर २९५ रुपये प्रती क्विंटलवरुन ३१५ रुपये प्रती क्विंटल करण्यात आला आहे. तर नियमीत प्रजातीचा दरल२७२ रुपये प्रती क्विंटलवरुन २८५ रुपये करण्यात आला आहे.

ऊस दरवाढ केली जाईल असे संकेत ऊस उद्योग तथा कायदा मंत्री प्रमोद कुमार यांनी तीन दिवसांपूर्वी दिले होते. ते म्हणाले होते की, साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी ऊस दरात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटीबद्ध आहे. शेतकऱ्यांना चांगला दर देऊन उत्तर प्रदेशसारखी वाढ देण्याचा प्रयत्न आहे असे त्यांनी सांगितले होते. दरम्यान, मंत्री प्रमोद कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून बिहारसाठी विशेष पॅकेज मिळाले असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here